मी अर्थतजज्ञ नसलो, तरी ...
देशाला भक्कम करताना शंभर टक्के करसंकलन होणे अपेक्षीत आहे. पण रिटर्न भरणाऱ्यांची संख्याही अवघी साडेचार पाच कोटींवर आहे. जीएसटीमुळे खरेदी-विक्री व्यवहारावरील खर्च कमी होईल असे काही वर्तमानपत्रातून वाचले, मुळात खरेदी विक्रीचे बहुतांश व्यवहार नोंदवताना मुळ व्यवहारापेक्षा कमी दर दाखवून उर्वरीत रक्कम कोणत्याही रेकॉर्डला न दाखवता व्यवहार केला जातो. त्यामुळे जीएसटी लागु होऊनही व्यवहार ठरलेल्या मुळ किंमतीप्रमाणे नोंदवले जातील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मला तर अर्थक्रांतीचा बँक व्यवहार कर योग्य वाटतो, आयात निर्यात कर सोडून सर्व ३२ करांची जागा एकाच बँक व्यवहार कराने घेतली तर कर चुकवणाऱ्यांचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
सरकारने पन्नास हजारांवरील व्यवहार बँक अथवा धनादेशाद्वारे करण्याची अट घालावी, आणि खात्यात जमा झालेल्या पैशांवर करआकारणी करावी. आधार कार्ड आल्यानंतर सव्वाशे कोटी देशातील सारेच जण आधार क्रमांक घेतील का ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आधार नोंदणीला चांगले यश आले आहे. तसे किरकोळ स्वरुपातील व्यवहार करण्यासाठी प्रत्येकालाच आता कार्ड (क्रेडिट, एटीएम) वापरायची सक्ती करायला हवी. अगदी भाजीविक्रेत्याकडेही कार्डमधून पैसे स्विकारण्यासाठी स्वॅप मशिन असायला हवे. टप्प्यटप्प्याने चलनी नोटांचे प्रमाण कमी करून सर्वच व्यवहार बँकेच्या माध्यमातून करायला हवेत. या व्यवहारातूनच दोन टक्के कर जमा केला, तर अर्थव्यवस्था भक्कम होण्यात अडचण येणार नाही.
-दीपक कांबळे, अहमदनगर, 9561159505
Comments
Post a Comment