Posts

Showing posts from August, 2017

पुरुषांची कोंडी केंव्हा फुटणार...,

बक्सर जिल्ह्याचे डीएम (IAS) अधिकारी मुकेश पांडे यांनी ऑगस्ट महिन्यात (नेमकी तारीख चार किंवा पाच असू शकते, माहित नाही) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. एखादा जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आत्महत्या कशी करू शकतो, यावर अनेक तर्क लढवले गेले. नंतर या आत्महत्येमागचे कारण मृत्यूपूर्वी मुकेश यांनीच मोबाईल व्हिडिओत शुटिंग करून ठेवले होते. त्यात धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे आई-वडील आणि त्यांची पत्नी यांच्यात सातत्याने वाद सुरू होते. घरात प्रत्येक किरकोळ गोष्टीवरून वाद होत असल्याने मुकेश वैतागले होते. आई-वडिल आणि पत्नी दोघेही बरोबरच होते, असेही त्यांनी स्पष्ट करून आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरले नाही. या निमित्ताने मला आपल्याशी दिलखुलास काही तरी बोलायचे आहे...., घरगुती कलहाला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे, आता या कलहाचे बळी पुरुषही ठरू लागले आहेत. किंबहुना शेकडो वर्षांपासूनही ठरत असतील. कुटुंबातील मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याला बायको आणि आई-वडिल दोघेही प्रिय असतात. पण आई-वडिल बऱ्याचदा सुनेच्या अवास्तव चुका काढून बडबड करत असतात. तिची गाऱ्हाणी मुलगा कामावरून आल्यानंतर त्याला सांगत असता...