आज-काल चा पाऊस
पाऊस येण्याची चाहूल
देणारा पावश्या, आकाशात झालेली ढगांची गर्दी, पानवारा, काही थेंबातच
मातीच्या उदरातून निघणारा दर्प सारे काही आपण लहानपणापासून अनुभवतो. सारे
जसे च्या तसेच असते. पण फरक असतो, तो काळाने आपल्या विचारात घडवलेल्या
बदलांचा. आताही पाऊस येतो, जसा काल येत होता. पण कालचा पाऊस अनुभवताना
वाटणारा अल्हाददायकपणा हल्ली जाणवत नाही. कारण कामाच्या व्यापात आपण इतके
गढून जातो, की निसर्ग अनुभवण्याचेही विसरून जातो. म्हणूनच माझे आवाहन आहे,
कामाच्या व्यापातून दूर डोंगराच्या कुशीत प्रत्येकाने पावसाळ्यात एकदा तरी
फिरायला जावे. ओसंडून वाहणारे धबधबे..., भिजलेल्या पाऊलवाटेवरून अनवाणी
फिरताना घसरणारे पाय, हिरवळीतून डोकावणारी रान फुले..., तुम्हाला पुन्हा
नवी उमेद देतील. झीमझीम पावसात चिंब भिजल्यावर कसे वाटले ते माझ्याशी
नक्कीच शेयर करा. अगदी तुमच्या खासगी अनुभवासह...करणार ना ?
- दीपक कांबळे
Comments
Post a Comment