Posts

Showing posts from June, 2017

आज-काल चा पाऊस

पाऊस येण्याची चाहूल देणारा पावश्या, आकाशात झालेली ढगांची गर्दी, पानवारा, काही थेंबातच मातीच्या उदरातून निघणारा दर्प सारे काही आपण लहानपणापासून अनुभवतो. सारे जसे च्या तसेच असते. पण फरक असतो, तो काळाने आपल्या विचारात घडवलेल्या बदलांचा. आताही पाऊस येतो, जसा काल येत होता. पण कालचा पाऊस अनुभवताना वाटणारा अल्हाददायकपणा हल्ली जाणवत नाही. कारण कामाच्या व्यापात आपण इतके गढून जातो, की निसर्ग अनुभवण्याचेही विसरून जातो. म्हणूनच माझे आवाहन आहे, कामाच्या व्यापातून दूर डोंगराच्या कुशीत प्रत्येकाने पावसाळ्यात एकदा तरी फिरायला जावे. ओसंडून वाहणारे धबधबे..., भिजलेल्या पाऊलवाटेवरून अनवाणी फिरताना घसरणारे पाय, हिरवळीतून डोकावणारी रान फुले..., तुम्हाला पुन्हा नवी उमेद देतील. झीमझीम पावसात चिंब भिजल्यावर कसे वाटले ते माझ्याशी नक्कीच शेयर करा. अगदी तुमच्या खासगी अनुभवासह...करणार ना ? - दीपक कांबळे

तळहातावरच्या रेषात डोकावून पाहताना..

.(हे माझे वैयक्तिक मत आहे, तुमची प्रतिक्रिया द्या..) आपण दैनंदिन कामात व्यापून गेलो असताना कधी तळहातावरच्या रेषांत डोकावून पहा. या रेषा जेथून सुरू झाल्या तीथपासून बारकाईने पाहिल्यास, अनेक जुन्या आठवणी नक्कीच सापडतील. पुढच्या वळणावरही आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन त्या पुन्हा जगण्याचा अट्टहास आपला प्रत्येकाचाच असतो. पण गेलीली वेळ आणि काळ परत आणता येत नाही, म्हणूनच भुतकाळ बदलवता येत नाही. पण वर्तमान काळ आणि भविष्यकाळावर त्याचा नक्कीच प्रभाव असतो. स्वत:च्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या नादात नकळतपणे वर्तमानकाळ (पती-पत्नीचे नाते) बिगडतो. या प्रकारामुळे आपलीच माणसे, स्वार्थासाठी त्यांनी केलेल्या चुकांमुळे कायमची दुरावतात. पुन्हा दुरुस्तीचीही संधी मिळणे कठीण असते. त्यामुळे आठवणींची शिदोरी जपून ठेवा, ती पुन्हा जगण्याचा प्रयत्न करणे अंगलट येणारे ठरू शकते. जीवनाला त्याच्या लयबद्ध प्रमाणात पुढे जाऊ द्या, त्यात तुम्ही मनाची खोटी समजूत घालून अट्टहास करणे टाळा, फक्त आपल्यामुळे आपल्याच माणसांना याचे दु:ख होणार नाही ना? याची काळजी घ्या. जर  भावनेच्या आहारी जाऊन, अशी चूक आपल्याच म...

मी अर्थतजज्ञ नसलो, तरी ...

देशाला भक्कम करताना शंभर टक्के करसंकलन होणे अपेक्षीत आहे. पण रिटर्न भरणाऱ्यांची संख्याही अवघी साडेचार पाच कोटींवर आहे. जीएसटीमुळे खरेदी-विक्री व्यवहारावरील खर्च कमी होईल असे काही वर्तमानपत्रातून वाचले, मुळात खरेदी विक्रीचे बहुतांश व्यवहार नोंदवताना मुळ व्यवहारापेक्षा कमी दर दाखवून उर्वरीत रक्कम कोणत्याही रेकॉर्डला न दाखवता व्यवहार केला जातो. त्यामुळे जीएसटी लागु होऊनही व्यवहार ठरलेल्या मुळ किंमतीप्रमाणे नोंदवले जातील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मला तर अर्थक्रांतीचा बँक व्यवहार कर योग्य वाटतो, आयात निर्यात कर सोडून सर्व ३२ करांची जागा एकाच बँक व्यवहार कराने घेतली तर कर चुकवणाऱ्यांचा प्रश्नच निर्माण होणार नाही. सरकारने पन्नास हजारांवरील व्यवहार बँक अथवा धनादेशाद्वारे करण्याची अट घालावी, आणि खात्यात जमा झालेल्या पैशांवर करआकारणी करावी. आधार कार्ड आल्यानंतर सव्वाशे कोटी देशातील सारेच जण आधार क्रमांक घेतील का ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आधार नोंदणीला चांगले यश आले आहे. तसे किरकोळ स्वरुपातील व्यवहार करण्यासाठी प्रत्येकालाच आता कार्ड (क्रेडिट, एटीएम) वापरायची सक्ती ...

खूप अस्वस्थ झोलोय...

दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त एका ग्रामपंचायत कार्यालयात गेलो, तेथे नेहमीसारखीच कार्यालयीन अधीक्षकांच्या टेबलसमोर गर्दी होती. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या होत्या. मी पत्रकार असल्याने मला आदराने खुर्ची मिळाली. त्याच गर्दीतून एक कोवळा आवाज कानावर पडला. पाहतो तर एक माझ्या परिचयाची नसलेली अनोळखी शाळकरी (आठवी इयत्तेत असावी) मुलगी उभी होती. कार्यालयीन अधीक्षकांना काहीतरी विनंती करत होती. नंतर मी विचारले काय झाले ? त्यावर अधीक्षकांनीच सांगितले. हिला गावातील एका नामांकित शासन मान्यता प्राप्त शाळेत प्रवेश हवा होता, पण डोनेशन भरण्याची परिस्थिती नसल्याने तिला प्रवेश मिळाला नाही. मग मी त्या मुलीला थेट विचारले काय अडचण आहे ? त्यावर ती म्हणाली, ‘ मला शिकायचे आहे, पण माझ्याकडे चार हजार रुपये फी भरण्यासाठी नसल्याने मला घरी बसावे लागले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माझ्या घरचे कोणीही शाळेत विचारायला गेले नाहीत, त्यामुळे माझे वर्ष वाया गेले. मला शिकण्याची इच्छा आहे, काही तरी करा प्लिज...’ तीचे शब्द ऐकूण माझी झांज उतरली. कॅशलेसच्या दिशेने निघालेल्या भारतात स्त्री शिक्षणाची अजूनही वा...
आयुष्यात कधीच दुसऱ्यांच्या चुका काढू नका -: आपल्या चुका जर कोणी सांगत असेल तर त्याचा राग धरू नये. कारण आपल्या माणसांनी आपल्यातल्या चुका दाखवून त्यात सुधारणा करण्याची संधी दिलेली असते. कुटुंबातील आपले स्थान वरिष्ठ आहे की कनिष्ठ याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सर्वांनाच आदर आणि आनंद दिला तर आपले स्थान आपोआपच उंचावते, पण त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. याच कालावधीत आपल्याला सिद्ध करण्याची संधी असते, असे मी मानतो. - दीपक कांबळे

पत्रकारांच्या वेदनांचा परिपाक...,

पत्रकार संरक्षण विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने पत्रकारांच्या विविध संघटनांमध्ये असलेली शीतस्पर्धाही समोर आली. ‘आम्ही पाठपुरावा केला म्हणून कायदा मंजूर’ अशा वल्गना आता सोशल साईटवर सुरू आहेत. माझा या प्रकाराला विरोध आहे, कारण हा कायदा पत्रकारांच्या वेदनांतून पाझरलेल्या कळांचा परिपाक आहे, असे मी मानतो. राज्यात मागील पाच वर्षात ३४३ पत्रकारांवर हल्ले झाले. २०१६ या एकाच वर्षात ७९ हल्ले झाले त्यात ८८ पत्रकार जखमी झाले. निर्भीड बातमीदारी करताना अनेकांना प्राण गमवावे लागले. ही सारी उठाठेव पत्रकार वेतन आयोग मागण्यासाठी कधीच करत नाही. तर सामान्य जनतेची गैरसोय करणाऱ्या यंत्रणेचे वाभाडे काढण्यासाठी तो लढतोय. गाडीला बायकोने लटवकलेल्या डब्यातली भाजी-भाकरी डब्यातच आंबून जाते,  हे त्याला दुपारच्या जेवनाचा डबा, चार वाजता उघडल्यावरच कळते. कोणत्याही पाठबळाअभावी, कोणत्याही शस्त्राविणा लेखनीच्या जोरावर मातब्बरांचा थरकाप उडवण्याची धमक माझा पत्रकार ठेवतो. वरच्या पदावर बसून राज्याच्या अन् देशाच्या राजकारणाचे गुऱ्हाळ कोणीही मांडते. प...