Posts

Showing posts from 2018
आता लोकशाहीबद्दल बोलावेच लागेल... ,   लो कशाहीला म्हणे तीन खांब असतात, एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन हेच ते तीन स्तंभ आहेत. आणि चौथा ज्याला अधिकृत मान्यता नाही, पण लोकमान्यता आहे, असा प्रसार माध्यमे (मिडिया) हा चौथा खांब आहे. मान्यताप्राप्त तीनही खांबांना भक्कमपणे बळकटी देऊन लोकशाहीचा डोलारा शाबिद ठेवणारा चौथा खांब कायम खंबीरपणे भूमिका बजावताना आपण पाहिले आहे. ग्राऊंड लेव्हलला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमुळेच हा चौथा खांब अजूनही तग धरून आहे. काही माध्यमे, काही पत्रकार असतीलही नालायक पण, काही खंबीर आणि ठाम आहेत, म्हणूनच मिडियाला महत्व आहे. न्यायपालिकेच्या न्यायाधीशांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी लोकमान्यता असलेला चौथा खांब म्हणजे पत्रकारांसमोर यावे लागले. याचा मला पत्रकार म्हणून सार्थ अभिमान आहे. आता काही लोक मिडियाला नावेच ठेवतात, समजा हा लोकमान्यता असलेला पत्रकारिता हा खांब बाजुला केला, तर काय होईल ? काही जणांना वाटते नव्याने उदयास आलेला सोशल मिडिया हा पाचवा खांब जास्त बळकट आहे. पण मला एवढेच सांगायचे पाचवा खांब बनू पाहणारा स...
सुतकाची बाधा, मंगलकार्याला का ? रुढी परंपरांविरोधी गेलो, तर त्याचे गंभीर परिणाम आपल्यासह पुढील पिढींना भोगावे लागतील, या भितीपोटी कर्मकांड माजवणाऱ्या दलालांना आजही मोठे महत्व असल्याचे मला प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे देश जगातली चौथी अर्थसत्ता म्हणून वेगाने पुढे जात आहे. हा २०२३ चा भारत आहे, आम्ही देखील हे नाकारत नाही. पण समाजव्यवस्था अजूनही बदलायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभाला जाण्याचा योग आला. आमच्याच एका नातेवाईक मित्राच्या कन्येचा धार्मिक प्रथेप्रमाणे विवाह योग जुळून आला. या मंगलप्रसंगापूर्वी दोन दिवस अगोदर त्यांच्याच भावकीतील एका जणाचा मृत्यू झाला. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना ‘सुतक’ नावाचा अजगर आडवा आला. त्याचा बोभाटाही गावभर पसरला. मग सुतकात लग्न करू नये, असा सल्ला जुने जाणकार देऊ लागले, तर काहींनी लग्न उरकून घ्या, असाही सल्ला दिला. दोन मतप्रवाह तयार झाल्याने कन्येच्या वडिलांनी एक नव्हे तर तीन प्रथापरंपरांच्या दलालांची भेट घेऊन काय करावे ? लग्न पुढे ढकलावे का ? किंवा काय करावे, अशी विचारणा केली. त्यावर या दलालांनी लग्नसमारंभ उरकण्यास ना...