आता लोकशाहीबद्दल बोलावेच लागेल... , लो कशाहीला म्हणे तीन खांब असतात, एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन हेच ते तीन स्तंभ आहेत. आणि चौथा ज्याला अधिकृत मान्यता नाही, पण लोकमान्यता आहे, असा प्रसार माध्यमे (मिडिया) हा चौथा खांब आहे. मान्यताप्राप्त तीनही खांबांना भक्कमपणे बळकटी देऊन लोकशाहीचा डोलारा शाबिद ठेवणारा चौथा खांब कायम खंबीरपणे भूमिका बजावताना आपण पाहिले आहे. ग्राऊंड लेव्हलला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमुळेच हा चौथा खांब अजूनही तग धरून आहे. काही माध्यमे, काही पत्रकार असतीलही नालायक पण, काही खंबीर आणि ठाम आहेत, म्हणूनच मिडियाला महत्व आहे. न्यायपालिकेच्या न्यायाधीशांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी लोकमान्यता असलेला चौथा खांब म्हणजे पत्रकारांसमोर यावे लागले. याचा मला पत्रकार म्हणून सार्थ अभिमान आहे. आता काही लोक मिडियाला नावेच ठेवतात, समजा हा लोकमान्यता असलेला पत्रकारिता हा खांब बाजुला केला, तर काय होईल ? काही जणांना वाटते नव्याने उदयास आलेला सोशल मिडिया हा पाचवा खांब जास्त बळकट आहे. पण मला एवढेच सांगायचे पाचवा खांब बनू पाहणारा स...
Posts
- Get link
- X
- Other Apps
सुतकाची बाधा, मंगलकार्याला का ? रुढी परंपरांविरोधी गेलो, तर त्याचे गंभीर परिणाम आपल्यासह पुढील पिढींना भोगावे लागतील, या भितीपोटी कर्मकांड माजवणाऱ्या दलालांना आजही मोठे महत्व असल्याचे मला प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे देश जगातली चौथी अर्थसत्ता म्हणून वेगाने पुढे जात आहे. हा २०२३ चा भारत आहे, आम्ही देखील हे नाकारत नाही. पण समाजव्यवस्था अजूनही बदलायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभाला जाण्याचा योग आला. आमच्याच एका नातेवाईक मित्राच्या कन्येचा धार्मिक प्रथेप्रमाणे विवाह योग जुळून आला. या मंगलप्रसंगापूर्वी दोन दिवस अगोदर त्यांच्याच भावकीतील एका जणाचा मृत्यू झाला. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना ‘सुतक’ नावाचा अजगर आडवा आला. त्याचा बोभाटाही गावभर पसरला. मग सुतकात लग्न करू नये, असा सल्ला जुने जाणकार देऊ लागले, तर काहींनी लग्न उरकून घ्या, असाही सल्ला दिला. दोन मतप्रवाह तयार झाल्याने कन्येच्या वडिलांनी एक नव्हे तर तीन प्रथापरंपरांच्या दलालांची भेट घेऊन काय करावे ? लग्न पुढे ढकलावे का ? किंवा काय करावे, अशी विचारणा केली. त्यावर या दलालांनी लग्नसमारंभ उरकण्यास ना...
सुखी माणसांचा ‘भ्रमिष्ट’ गट ...
- Get link
- X
- Other Apps
ज गात कोणीच सुखी नाही, प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक तसेच सामाजिक कारणांमुळे चिंता असते. या चिंतेत तो इतका गुरफटून जातो, की त्याचे रुपांतर मानसिक तणाव तसेच वेदनेत होत असते. या चिंतेचे मळभ दूर करण्यासाठी दिवस अन् रात्र सुरू असलेल्या निरर्थक प्रयत्नाला आपण दु:ख म्हणायला हवे. जगात कोणीच सुखी नाही, हे आपण अनेकांच्या तोंडून ऐकत असतो आणि त्यावर आपला ठाम विश्वासही आहे. पण, मला सुखी माणसं सापडली आहेत, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या माणसांना सुख आणि दु:ख कशाला म्हणतात याची जाणीव नसावी बहुतेक. पण मला या माणसांचा हेवा वाटायला लागलांय. अशा माणसांना मी *‘सुखी माणसांचा भ्रमिष्ट गट’* आ पण कोणत्याही कामात असो वा एकटे, मनात माजलेलं विचारांच काहूर स्वस्थ बसू देत नाही. वर्तमानाची चिंता अन् भविष्याची हुरहूर अशी काहीशी अवस्था प्रत्येकाचीच असते. झिम झिम पाऊस सुरू होता, बातमीसाठी आवश्यक माहिती घेऊन मी घाईने ऑफिसकडे निघालो होतो. या माहितीचा कागद भिजला तर अडचण होईल, या चिंतने मोटारसायकलीचा वेगही वाढवला होता. एका चौकात माझे लक्ष कचऱ्याच्या एका मोठ्या ढिगाऱ्याकडे गेले. या ढिगाऱ्याला अगदी खेटून...
राग अन् तिरस्कारात गल्लत नको
- Get link
- X
- Other Apps
प्रत्येकामध्ये माया उत्पन्न होऊ शकते, तसाच रागही उत्पन्न होऊ शकतो. ही उत्पत्ती आपल्या आपली आवडी -निवडी व स्वभावानुसार होत असते. कोणत्याही समुहात जेथे माणसांची नाती एकमेकांच्या विश्वासार्हतेवर घट्ट झालेली असतात. अशी नाती कुटुंब किंवा संस्था यामध्ये पहायला मिळतात. चुकीच्या बाबी दुरुस्त करण्यासाठी रागावने, हा त्या समुह प्रमुखाचा अधिकार असतो. त्याबरोबरच सर्व सदस्य समान धरून कारभार करण्याची जबाबदारीही असते. पण जेंव्हा समुहप्रमुख सदस्यांमध्येच आवडी निवडी सुरू करतो, तेंव्हा काहीतरी बिघडलेले असते. राग येणे हा स्वभाव व गरज दोन्हीही आहे. पण जेंव्हा आपण एखाद्या व्यक्तिबद्दल आपले मत बनवून घेतो, आणि समोरची व्यक्ती चुकीची आणि मुद्दाम वागते असा आपला ठाम समज होतो. यातूनच तिरस्काराची निर्मिती होते. या तिरस्कारात आपण समोरच्या वक्तीवर केवळ रागावत नाही, तर रागराग करतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर रागावने आणि तिरस्कार करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे राग अन् तिरस्कारात गल्लत नको. -दीपक कांबळे....
नाव, आडनावांच्या पलीकडे...,
- Get link
- X
- Other Apps
नाव, आडनावांच्या पलीकडे..., आज परिस्थिती खूप बदलली आहे, जात व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार केला तर आपण फक्त हाडे आणि मांसाचे व्यक्ती आहोत. किंवा माणूस आहोत. जन्माला आल्यानंतर धर्म व जात निश्चित होते. पण जीवनात जाती आणि धर्माच्या भिंती आता इतक्या भक्कम होत आहेत, की जाती व धर्माच्या नावावर मरायाला किंवा मारायलाही काही जण मागे पुढे पहात नाही. या प्रकारामुळे माणूसपण हरवत चालले आहे. एखाद्याच्या नाव किंवा आडनावावरून आपण त्याची जात किंव धर्म ठरवतो. एखादा अनोळखी भेटला तर लगेच त्याचे आडनाव विचारतो. हे कशासाठी ? फक्त जात आणि धर्म माहित व्हावी हाच गुप्त हेतु असतो ना ? बहुतेकांचा असतोच, उगाच रेटून नेऊ नका ..., माझे एवढेच मत आहे, की आता बस झाले जात आणि धर्माच्या चौकटीत कट्टरवाद जपणे, किंवा खासगी भाषेत खानदान जपणे ...., जर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळून उत्स्फूर्तपणे असे विवाह होऊ लागले, तर सारे जण एक परिवार होतील. ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात,’ असे आपण म्हणतो, बरोबर ना ? पण मग या गाठी एकाच जातीत का बांधल्या जातात ?, स्वर्गातही कट्टर जातीयवाद पाळला जातो, या निष्क...
पुरुषांची कोंडी केंव्हा फुटणार...,
- Get link
- X
- Other Apps
बक्सर जिल्ह्याचे डीएम (IAS) अधिकारी मुकेश पांडे यांनी ऑगस्ट महिन्यात (नेमकी तारीख चार किंवा पाच असू शकते, माहित नाही) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. एखादा जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आत्महत्या कशी करू शकतो, यावर अनेक तर्क लढवले गेले. नंतर या आत्महत्येमागचे कारण मृत्यूपूर्वी मुकेश यांनीच मोबाईल व्हिडिओत शुटिंग करून ठेवले होते. त्यात धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे आई-वडील आणि त्यांची पत्नी यांच्यात सातत्याने वाद सुरू होते. घरात प्रत्येक किरकोळ गोष्टीवरून वाद होत असल्याने मुकेश वैतागले होते. आई-वडिल आणि पत्नी दोघेही बरोबरच होते, असेही त्यांनी स्पष्ट करून आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरले नाही. या निमित्ताने मला आपल्याशी दिलखुलास काही तरी बोलायचे आहे...., घरगुती कलहाला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे, आता या कलहाचे बळी पुरुषही ठरू लागले आहेत. किंबहुना शेकडो वर्षांपासूनही ठरत असतील. कुटुंबातील मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याला बायको आणि आई-वडिल दोघेही प्रिय असतात. पण आई-वडिल बऱ्याचदा सुनेच्या अवास्तव चुका काढून बडबड करत असतात. तिची गाऱ्हाणी मुलगा कामावरून आल्यानंतर त्याला सांगत असता...