तळहातावरच्या रेषात डोकावून पाहताना..
.(हे माझे वैयक्तिक मत आहे, तुमची प्रतिक्रिया द्या..)
आपण दैनंदिन कामात व्यापून गेलो असताना कधी तळहातावरच्या रेषांत डोकावून पहा. या रेषा जेथून सुरू झाल्या तीथपासून बारकाईने पाहिल्यास, अनेक जुन्या आठवणी नक्कीच सापडतील. पुढच्या वळणावरही आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन त्या पुन्हा जगण्याचा अट्टहास आपला प्रत्येकाचाच असतो. पण गेलीली वेळ आणि काळ परत आणता येत नाही, म्हणूनच भुतकाळ बदलवता येत नाही. पण वर्तमान काळ आणि भविष्यकाळावर त्याचा नक्कीच प्रभाव असतो. स्वत:च्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या नादात नकळतपणे वर्तमानकाळ (पती-पत्नीचे नाते) बिगडतो.
या प्रकारामुळे आपलीच माणसे, स्वार्थासाठी त्यांनी केलेल्या चुकांमुळे कायमची दुरावतात. पुन्हा दुरुस्तीचीही संधी मिळणे कठीण असते. त्यामुळे आठवणींची शिदोरी जपून ठेवा, ती पुन्हा जगण्याचा प्रयत्न करणे अंगलट येणारे ठरू शकते. जीवनाला त्याच्या लयबद्ध प्रमाणात पुढे जाऊ द्या, त्यात तुम्ही मनाची खोटी समजूत घालून अट्टहास करणे टाळा, फक्त आपल्यामुळे आपल्याच माणसांना याचे दु:ख होणार नाही ना? याची काळजी घ्या. जर भावनेच्या आहारी जाऊन, अशी चूक आपल्याच माणसांकडून झाली असेल तर एकदा माफ करण्याचे धाडस दाखवून एक संधी द्या. पहा आपल्या माणसांचा आपल्यावरील विश्वास अधिक दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चूक लक्षात आल्यानंतर आपणही विश्वासास पात्र ठरण्याचा निश्चय केला पाहिजे.
म्हणून माझा एक वैयक्तिक सल्ला असेल, तळहातावरच्या रेषांमध्ये फक्त डोकावून पाहा, त्या बदलवण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. जर तसा प्रयत्न केला, तर आपल्यावर अवलंबून असलेली निरागस लहान-मोठी माणसंही (कुटुंब) आपल्याबरोबर उध्वस्त होतील. त्यात या निरागस लोकांचा काहीच संबंध नसतो, केवळ नशिब बदलवण्याच्या प्रयत्नात हे होऊ शकतं...,
- दीपक कांबळे -

Comments
Post a Comment