Posts

Showing posts from 2016

जीवनप्रवास...

जीवनप्रवास... माझे पहिले ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतले. मला आजही आठवते, माझा पहिलीच्या वर्गात ४५ वा क्रमांक आला. त्याचवेळी वडिलांना प्रश्न पडला की, मुलगा पुढे शिकून मोठा होणार की नाही ?. पण रडतकठत पाचवीत पोहोचलो. वडिल नोकरीनिमित्त माझ्या जन्मापासून दूर्गम भागात असल्याने मला आजी व आजोबांबरोबर शिक्षणासाठी ठेवले होते. पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण वांबोरीतच झाले. पुढे वडिलांची बदली नाशिकला झाली होती, घरगुती कलह वाढत असल्याने वडिलांनी मला व माझ्या लहान भावाला पुढील शिक्षणासाठी नाशिकला आणले. मला आठवीत प्रवेश घ्यायचा होता, त्यावेळी वडिलांना जेमतेम पगार होता, त्यांना वांबोरीत माझ्या आजी व आजोबांनाही पैसे पुरवायचे. त्यामुळे शाळेतील प्रवेशाला आवश्यक डोनेशन कोठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नाशिकला सीबीएस बस स्टँन्डजवळच बिट्को बॉईज हायस्कूल होते. वडिलांनी प्रवेशाची माहिती घेतली असता माझ्यासह माझ्या भावासाठी साडेतीन हजार रुपयांचे डोनेशन भरावे लागणार हे नक्की झाले. त्यावेळी वडिलांनी बोटातली अंगठी मोडून प्रवेश मिळवला. पुढे दहावीची परीक्षा होती, परंतु मी चंचल...