नाव, आडनावांच्या पलीकडे...,
नाव, आडनावांच्या पलीकडे...,
आज
परिस्थिती खूप बदलली आहे, जात व धर्माच्या पलीकडे जाऊन विचार केला तर आपण
फक्त हाडे आणि मांसाचे व्यक्ती आहोत. किंवा माणूस आहोत. जन्माला आल्यानंतर
धर्म व जात निश्चित होते. पण जीवनात जाती आणि धर्माच्या भिंती आता इतक्या
भक्कम होत आहेत, की जाती व धर्माच्या नावावर मरायाला किंवा मारायलाही काही
जण मागे पुढे पहात नाही. या प्रकारामुळे माणूसपण हरवत चालले आहे.
एखाद्याच्या नाव किंवा आडनावावरून आपण त्याची जात किंव धर्म ठरवतो. एखादा
अनोळखी भेटला तर लगेच त्याचे आडनाव विचारतो. हे कशासाठी ? फक्त जात आणि
धर्म माहित व्हावी हाच गुप्त हेतु असतो ना ? बहुतेकांचा असतोच, उगाच रेटून
नेऊ नका ..., माझे एवढेच मत आहे, की आता बस झाले जात आणि धर्माच्या चौकटीत
कट्टरवाद जपणे, किंवा खासगी भाषेत खानदान जपणे ...., जर आंतरजातीय
विवाहांना प्रोत्साहन मिळून उत्स्फूर्तपणे असे विवाह होऊ लागले, तर सारे जण
एक परिवार होतील. ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात,’ असे आपण
म्हणतो, बरोबर ना ? पण मग या गाठी एकाच जातीत का बांधल्या जातात ?,
स्वर्गातही कट्टर जातीयवाद पाळला जातो, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलाे.
किंवा स्वर्ग अस्तित्वातच नाही, हे फक्त मानवाने झुंडी बनवण्यासाठी
रचलेल्या धार्मिक कथानकांचे गारूड आहे, असे मानतो. आता मी हे सारे लिहितो,
म्हणजे तुम्ही लगेच माझे आडनावड तपासून पाहणार ..हो की नाही..., तुम्हाला
माझी जात सापडेल यातही मला शंका नाही. पण येथे सांगतो मला जातीयवादाचा
कोणताही त्रास नाही. उलट माझे सर्व जाती धर्मातील जिवलग मित्र आहेत. त्यातच
काही विद्रोही विचारांचेही आहेत, त्यांनाही मी मानतो. आज मला याठिकाणी
सांगायला आनंद वाटतो, की माझ्या एका मुलीचे नाव हिंदु धर्मातील ठेवले आहे,
तर लहान मुलीचे नाव मुस्लिम धर्मातून ठेवले आहे.
- दीपक कांबळे, गर्भगिरीचा काटा
Comments
Post a Comment